आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SEX केसमध्ये फसलेल्या हॉट योग गुरुच्या शिष्याचा खुलासा, प्रायव्हेट मसाज करायला सांगितला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदीपकौर संधू (फाइल फोटो) - Divya Marathi
मंदीपकौर संधू (फाइल फोटो)
मुंबई - हॉट योग गुरु विक्रम चौधरीला अमेरिकेतील एका न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणात सहा कोटींचा दंड ठोठावला होता. विक्रम चौधरीवर त्याचीच वकील राहिलेली मीनाक्षी जाफा हिचे लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप होता. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असून या प्रकरणात साक्षीदार असलेली मुंबईची योगा टीचर मंदीपकौर संधूने चौधरीबद्दलचे अनेक रहस्य उलगडले आहेत.

काय सांगितले मंदीपकौर यांनी
- एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मंदीपकौर संधूने सांगितले, विक्रम चौधरीने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. ती 2009 मध्ये योगा प्रशिक्षणासाठी लासवेगास येथे चौधरीकडे गेली होती, तेव्हा चौधरीने तिला प्रायव्हेट मसाज करण्यास सांगितले होते.
- एवढेच नाही चौधरीची तिच्यावर वाईट नजर होती. जेव्हा संधू त्याला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तो अंडरवेअरवर असताना तिला भेटला.

प्रायव्हेट मसाज करण्यास सांगितला
एकदा जवळपास अर्धा तास मसाज केल्यानंतर हॉट योग गुरुने संधूला म्हटले इंडियन वीक असतात, कारण ते व्हेजिटेरियन असतात. संधूने याकडे दुर्लक्ष केले. मात्र एकदा विक्रम चौधरीने तिला रात्री दोन वाजता बोलावून प्रायव्हेट मसाज करण्यास सांगितला. त्याला संधूने नकार दिला. तेव्हा हॉट योगा गुरु बराचवेळ तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तिने काही एक ऐकले नाही आणि ऑफिसमधून बाहेर पडली.

कोण आहे विक्रम चौधरी
69 वर्षीय विक्रम चौधरी 'विक्रम योगा'चा संस्थापक आहे. संपूर्ण जगात त्याचा हॉट योगा प्रसिद्ध आहे. त्याच्या फॉलोअर्समध्ये हॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते आहेत. बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लुनी सारखे अभिनेते, राजकारणी आणि क्रीडा जगतातील स्टार्स त्याचे शिष्य राहिले आहेत.

काय आहे हॉट योगा
विक्रम चौधरी त्याच्या शिष्यांना 40 डिग्री सेल्सिअसमध्ये योगा प्रशिक्षण देतो. त्याला त्याने हॉट योगा असे नाव दिले आहे. जगभरातील 220 देशांमध्ये त्याचे 720 विक्रम योगा प्रशिक्षण केंद्र आहे. यावरुन त्याच्या लोकप्रियतचा अंदाज येऊ शकतो. यातील डझनावरी प्रशिक्षण केंद्र एकट्या ब्रिटनमध्ये आहेत. प्रसिद्ध टेनिस खेळाडू अँडी मरेपासून फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम पर्यंत अनेक दिग्गजांनी त्यांच्या पडत्या काळात विक्रम चौधरीशी संपर्क केला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मंदीपकौर संधू आणि विक्रम चौधरींचा योगा निवडक फोटोमधून