आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा दरोडा; २२ किलाे सोन्याची लूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवी मुंबई येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीत भरदिवसा ७ जणांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवत २२ किलाे सोने शनिवारी लुटले. सीवूड स्टेशनसमोर कंपनीचे हे कार्यालय आहे. दुपारी सात जण शस्त्रांसह कंपनीत घुसले. सर्व कर्मचाऱ्यांना धमकावत सुमारे २२ किलो साेने या दरोखोरांनी लुटून नेले. ही माहिती मिळताच पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकेबंदी केली असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...