आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: लग्नाच्या मंडपातून नटलेली \'पायल\'च जेव्हा पळून जाते...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लग्नमंडपातून नवरदेव अथवा नवरी पळून गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. लग्नात मान-पान यावरून वधू-वरांत हाणामारी झाल्याच्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. पण मुंबईत परवा म्हणजे 23 जून रोजी झालेल्या लग्नात एक अनोखीच घटना घडली. या अनोखी घटनेची हिरोईन आहे पायल.
होय पायल.. पण ही पायल ही मुलगी नाही तर एका घोडीचे नाव आहे. तर या पायल घोडीने एक मोक्याची क्षणी पळ काढून नवरदेवाला चांगलाच दणका दिला. झाले असे की, वरातीसाठी पायलला सजवून मंडपात आणले गेले.
नवरदेव तयार झाला होता व काही मिनिटांतच वरात काढण्यासाठी हजर होणार होता. मात्र, तोपर्यंत पायलला मंडपात नाचविण्यासाठी घोडेस्वराने तिला चाबकाने मार दिला. पायात आधीच जखम असल्याने व मालकाचा मार पडल्याने पायल बिथरली. अखेर तिने भरमंडपातून पळ काढण्याचे ठरवले व क्षणात हवेत उडी घेऊन सुसाट धावू लागली. दुपारी साडेतीनला मंडपातून धूम ठोकल्यानंतर पायल चार वाजता वांद्रे-वरळी सीलिंकवर पोहचली. मात्र, जखमी घोडी भर रस्त्यातून धावत सुटल्याने सीलिंकवरून वाहनांना वेगाने जाता येईना.
पायल बिथरल्याने ती संपूर्ण रस्त्यावरून आडवी-तिडवी पळत होती. त्यामुळे वाहनांखाली येण्याची भीती होती. त्यामुळे सीलिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली. अखेर सीलिंकवरील टोल कर्मचा-यांनी पायलबाबत मुंबई पोलिस कंट्रोल रूमला कळविले. त्यानंतर सुमारे अर्धाएक तास पायलने कंट्रोल रूमच्या कर्मचा-यांनाही तंगवले.
अखेर ती सापडली मात्र तोपर्यंत वाद्रें सीलिंकवरील सीसीटीव्ही कॅमे-याने पायलाच थरार कैद केला होता.
पुढे पाहा, वांद्रे-वरळी सीलिंकवरून बेभान व सुसाट धावतानाची पायलची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...