आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Saji Thomas, A Deaf mute, Built An Aircraft With Just Rs 14 Lakh

Can\'t imagine : सातवी शिकलेल्‍या मूक-बधीर युवकाने बनवले हेलिकॉप्‍टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तो जन्‍मताच मूक बधीर. घरात एकूण तीन भावडं. पण, मूक-बधीर असलेल्‍या त्‍याला शिकवून काय करायचे, या विचाराने त्‍याच्‍या मध्‍यवर्गीय पालकांनी सातव्‍या वर्गातच त्‍याचे शिक्षण बंद केले. पण, अल्‍पशिक्षित हाच मुलगा त्‍यांच्‍या कुळाचा उद्धार बनला. कुठलेही तंत्र शिक्षण न घेता त्‍याने अवघ्‍या 14 लाख रुपयांत हेलिकॉप्‍टर बनवले. ही यशकथा आहे ती केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील थोदुपुझा गावातील साजी थॉमस यांची.
वयाच्‍या पाचव्‍या वर्षीच बनवली खेळणी
साजी यांना कळायला लागले तसे यंत्र, स्‍वयंलचित खेळणी यांच्‍याकडे ते आ‍कर्षित व्‍हायला लागले. त्‍यांनी वयाच्‍या पाचव्‍या वर्षीच कार्डबोर्डची कार, बस आणि एयरोप्लेन बनवणे सुरू केले. मात्र, त्‍यांच्‍या या प्रतिभेकडे त्‍यांच्‍या मध्‍यवर्गीय आई-वडिलांनी दुर्लक्ष केले. पुढे दुरदर्शनचा काळ आला. दरम्‍यान, त्‍यांनी कुठलेही प्रशिक्षण न घेत टीव्‍ही दुरुस्‍त करण्‍यात कौशल्‍य प्राप्‍त केले. हेच त्‍यांचे रोजगाराचे साधन बनले. पार्टटाइम म्‍हणून ते लग्‍नात फोटोग्राफी करत. पण, मशीन खोलणे, त्‍यात काय आहे ते पाहाणे आणि दुरुस्‍त करणे हा त्‍यांचा छंद बनला होता. तो आजही कायम आहे.

पंधराव्‍या वर्षी सोडले घर अन् बनवले हेलिकॉप्‍टर

साजी यांनी एके दिवशी आकाशात उडणारे दोन विमान पाहिले. त्‍यानंतर आपण आकाशात उडायचे आणि असेच विमान तयार करायचे हा निश्‍चय त्‍यांनी केला. त्‍यासाठी त्‍यांनी वयाच्‍या 15 व्‍या वर्षी घर सोडले आणि थेट मुंबई गाठली. येथे त्‍यांनी हेलिकॉप्‍टर उडाणच्‍या कंपनीबद्दल माहिती मिळवली. दरम्‍यान, काही पायलटसोबत मैत्री केली. एका पायलटने त्‍यांनी हेलिकॉप्‍टमधून मुंबईची सैर घडवून आणली. दरम्‍यान, साजी यांची हेलिकॉप्‍टर बनवण्‍याची इच्‍छा प्रबळ झाली. हेलिकॉप्‍टर कसे चालवावे ते कसे काम करते, याची माहिती असणारी दोन पुस्‍तके पायटने त्‍यांनी दिली. दरम्‍यान, साजी हेलिकॉप्‍टर उडवणेही शिकले. त्‍यासाठी त्‍यांना वायुसेनेचे रिटायर्ड व्‍हींग कमांडर एसकेजे नायर यांनी सहकार्य केले.
टाकाऊ वस्‍तूपासून बनवले हेलिकॉप्‍टर
साजी यांनी हेलिकॉप्‍टर बनवण्‍यासाठी बाजारातून अनेक टाकाऊ वस्‍तू खरेदी केल्‍या आणि पाच वर्षांत ते तयार केले. त्‍यासाठी त्‍यांना आपल्‍या वाट्यावर येणारी शेत जमीनसुद्धा विकावी लागली. मनीमुथर घाटीमध्‍ये ते उडवले गेले.
केला लाकडाचा वापर
एयरक्राफ्टमध्‍ये प्रोपेलर फायबर ग्लास लावलेला असतो. पण, साजी यांनी त्‍याऐवजी लाकडाचा प्रोपेलर बसवले. यासाठी कमीत कमी 40 हजार रुपये खर्च येतो. पण, त्‍यांनी हे काम केवळ पाच हजार रुपयांत करून दाखवले.
पती-पत्नीने मिळून गोळा केला पैसा
रस्त्याच्या शेजारी साजी दुकान लावतात. त्यातून मिळणार्‍या पैशातून ते चरितार्थाचे पैसे त्यांनी हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी खर्च केले. साजी यांची पत्नी मारिया यांनी हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी लागणारी माहिती इंटरनेटवरून गोळा केली.
20 फुटांहून उडते
हेलिकॉप्टरला अंबासमुद्रम येथे (तामिळनाडू) एका खासगी रन-वे वरून उडवणारे निवृत्त विंग कमांडर यांच्या म्हणण्यानुसार 20 फुटांहून अधिक उंचीवर उडवण्यासाठी डीजीसीए यांची परवानगी आवश्‍यक आहे.
- 05 वर्षे लागली तयार करण्यासाठी
- 14 लाख रुपये खर्च
- 20 फूट उंचीपर्यंत उडण्याची क्षमता.
- 265 किलो याचे वजन.
- 65 बीएचपी हट्‍स्झचे इंजिन.
पुढील स्लाइड्सवर साजी यांनी बनवलेले हेलिकॉप्‍टर..