आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

78 हजार कोटींचा घोळ होईल कसा ?,जलसंपदामंत्री सुनील तटकरेंचा विरोधकांना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात 1951 पासून आतापर्यंत 73 हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले आहेत. कोयना, उजनी, भातसा, गोदावरी, भंडारदरा असे मोठमोठे प्रकल्प, 3 हजार 100 लघु, तर 250 मध्यम प्रकल्प यातून उभे राहिले आहेत. एकूण खर्चच 73 हजार कोटी खर्च झाला असेल, तर 78 हजार कोटींचा भ्रष्टाचार होईलच कसा? असा सवाल जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत केली.

सिंचन घोटाळय़ावर चर्चेचा प्रस्ताव विनोद तावडे यांनी मांडला होता. मात्र, सभापतींनी त्यास परवानगी न दिल्याने गेल्या चार दिवसांपासून विधान परिषदेचे कामकाज विस्कळीत झाले होते. गुरुवारी या विषयावरी चर्चेला उत्तर देताना तटकरे म्हणाले की, ‘कॅग’च्या अहवालातही सिंचनात भ्रष्टाचार झाल्याचे म्हटलेले नाही. तसे म्हटले असेल तर आम्ही कोणी मंत्रिपदावर राहणार नाही. प्रकल्प का रेंगाळले, खर्च का वाढला याची सर्व कारणमीमांसा स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका आम्ही प्रसिद्ध केली. प्रकल्पांच्या जमिनी वन खात्याकडे असल्यामुळेच प्रकल्प रेंगाळल्याचे त्यांनी सांगितले.
सीबीआय चौकशी करा
रामदास कदम यांनी घोटाळ्याची ‘सीबीआय’ चौकशीची मागणी केली. कोकणातील 93 प्रकल्पांपैकी केवळ 14 प्रकल्प पूर्णत्वास गेले असून रखडलेल्या प्रकल्पांना निधी देण्याची मागणी त्यांनी केली. केली. डॉ. नीलम गोर्‍हे यांनी 1999 ते 2013 या काळात जलसिंचन आयोगाने केलेल्या 329 शिफारशींचे काय झाले, असा सवाल केला. पांडुरंग फुंडकर, कपिल पाटील, जयंत पाटील, आशिष शेलार यांनी चर्चेत भाग घेतला.