आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांना दहीहंडीत सहभागी कसे करता? हायकाेर्टाचा राज्य सरकारला सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य सरकारने २०१५ मध्ये दहीहंडीला उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला होता. त्यावर साहसी खेळाच्या नावावर पाच वर्षांच्या मुलाला कसे काय मानवी मनोऱ्यावर चढू देता, असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने साेमवारी राज्य सरकारला विचारला. कोर्टाने साहसी क्रीडा प्रकाराची व्याख्या स्पष्ट करण्याचे आदेश दिले. 

सन २०१५ मध्ये हायकोर्टाच्या दिशानिर्देशांचे भाजप नेते आशिष शेलार व इतरांनी दहीहंडीच्या उत्सवात उल्लंघन केल्याच आरोप करत एक याचिका हायकाेर्टात दाखल झाली आहे. याचिकाकर्त्याने सोमवारी कोर्टाला कळवले की, हायकोर्टाने २०१५ मध्ये दहीहंडी उत्सवावर काही निर्बंध आणल्यानंतर राज्य सरकारने ११ त्याच वर्षी ऑगस्टला विधेयक आणून दहीहंडीला साहसी क्रीडाप्रकाराचा दर्जा दिला होता. त्यानुसार जर संबंधित मुलांच्या पालकांनी लेखी परवानगी दिल्यास ११ वर्षांवरील बालकांना दहीहंडीत भाग घेण्याची मुभा राज्य सरकारकडून अायाेजकांना देण्यात अाली हाेती. साेमवारी या याचिकेची सुनावणी करताना त्याचा संदर्भ देत हायकोर्टाने साेमवारी सांगितले की,  दहीहंडी हा साहसी क्रीडाप्रकार आहे का? लहान मुलांना अशा खेळात कसे काय सहभागी होऊ देता? साहसी खेळाचा अर्थ काय आहे?