आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Take Maharashtra Forward ? Anand Sharma Questioned To Modi

महाराष्ट्राला आणखी पुढे कसे नेणार?, आनंद शर्मा यांचा मोदींना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्राचा अवमान करीत आहेत. राज्याची सत्ता आमच्या हाती दिल्यास महाराष्ट्राला गुजरातपेक्षाही पुढे नेण्याची वल्गना ते करत आहेत. मात्र महाराष्ट्र आधीपासूनच गुजरातपेक्षा पुढे आहे. तर या राज्याला आणखी कुठे पुढे नेणार?,’ असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी रविवारी मोदींना विचारला.

पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘विकासाबाबत महाराष्ट्र नेहमीच गुजरातपेक्षा पुढे आहे. परकीय गुंतवणूक, उद्योग, सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्र गुजरातपेक्षा सरस आहे. या आघाड्यांवर महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठेच नाही. याउलट गुजरातमध्येच मानव विकास निर्देशांक खालावला आहे. कुपोषण, शाळांमधील गळती, अल्पसंख्याकांमधील भीती या समस्या त्या राज्यात गंभीर होत आहेत,’ याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले.