आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज 12 वीचा निकाल; दुपारी 1 वाजेपासून या संकेतस्‍थळांवर पाहू शकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ३० मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होईल. निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवडाभर अफवांचे पीक आले होते. त्यांना आता पूर्णविराम मिळेल. बारावीच्या परीक्षेला यंदा १५ लाख पाच हजार ३६५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा बारावीच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर तपासणीचे काम सुरळीत झाले. मात्र  त्यामुळे  निकालाला जरा वेळ लागल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.  www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता निकाल जाहीर होईल. बारावीची पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून सुरू होईल, असेही पाटील म्हणाले. 
 
 
या संकेतस्‍थळावर पाहू शकाल निकाल
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. http://www.knowyourresult.com
5. www.rediff.com/exams
6. http://jagranjosh.com/results
7. http://htcampus.com/results
 
एसएमएसद्वारे निकाल कसा मिळवायचा? जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...