Home | Maharashtra | Mumbai | http://ebalbharati.this website in Balabharati

'किशोर’चे 46 वर्षांतील अंक ‘बालभारती’च्या संकेतस्थळावर

समीर परांजपे | Update - Apr 06, 2017, 03:06 AM IST

बालगोपाळांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या व बालभारती संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाच्या गेल्या ४६ वर्षांच्या अंकांमधील सुमारे तीस हजार पानांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने सुरू अाहे.

 • http://ebalbharati.this website in Balabharati
  ‘किशाेर’ मासिकाच्या प्रथम व अात्ताच्या अंकाचे मुखपृष्ठ.
  मुंबई- बालगोपाळांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या व बालभारती संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाच्या गेल्या ४६ वर्षांच्या अंकांमधील सुमारे तीस हजार पानांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने सुरू अाहे. येत्या महिनाभरात ‘किशोर’चे हे सर्व अंक वाचकांसाठी बालभारतीच्या http://ebalbharati.in या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध होणार आहेत. किशोर अंकांच्या डिजिटायझेशनचे हे काम बुकगंगाचे संचालक मंदार जोगळेकर कुठलाही माेबदला न घेता करत अाहेत.
  पाठ्यपुस्तकाबरोबर इतर पूरक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर १९७१ रोजी बालभारतीने ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी “किशोर’ हे मासिक सुरू केले हाेते. सध्या किशोर मासिकाचा खप ६५ हजार प्रती एवढा आहे. किशोरने मागील अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे आणि मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक कवी, लेखक, चित्रकार या मासिकाने घडवले आहेत. हा सर्व ठेवा जुन्या आणि नवीन पिढीसाठी उपलब्ध व्हावा म्हणून बालभारतीने बालभारतीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आजवरचे सर्व किशोर अंक डिजिटलाइज करण्याचा निर्णय घेतला. बालभारतीचे विद्यमान संचालक डॉ. सुनील मगर यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प आकारास येत आहे.
  ‘किशोर’ कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी सांगितले, गेल्या ४६ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक नामवंत लेखक, कवी, चित्रकार यांनी किशोरसाठी योगदान दिले आहे. जुन्या अंकांची वाचकांकडून सातत्याने मागणी होत होती. डिजिटलायजेशनच्या निमित्ताने हा सर्व दुर्मिळ खजिना ऑनलाइन मोफत उपलब्ध होणार आहे. आजवर किशोर मासिकाच्या एकूण अंकांपैकी २० वर्षांच्या अंकांचे डिजिटलायजेशन पूर्ण झाले असून उरलेल्या वर्षांतील अंकांच्या पानांचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल. बालकांना एका महिन्यात हा वाचनाचा खजिना उपलब्ध हाेणार असल्याचेही केंद्रे म्हणाले.
  एक रुपयाही न घेता डिजिटायझेशन
  - किशोर हे मासिक मला लहानपणापासून खूप आवडायचे. किशोरचे सारे अंक आजच्या बालगोपाळांनाही उपलब्ध झाले पाहिजेत, असे मला मनापासून वाटायचे. त्या दृष्टीने मी हे सर्व अंक एकाही पैशाचा मोबदला न घेता डिजिटाइझ करून देण्याचा प्रस्ताव मी बालभारतीसमोर ठेवला. तो त्यांनी मान्य केला. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपे या गावी किशोरच्या डिजिटयझेशनचे काम सुरू आहे.
  मंदार जोगळेकर, संचालक, बुकगंगा
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • http://ebalbharati.this website in Balabharati

Trending