आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत मानखूर्दमधील भंगार गोदामाला भीषण आग, 10-15 अग्निशमन दलाच्‍या गाड्या घटनास्‍थळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबर्इमध्‍ये मानखूर्द येथे मंडाळा परिसरात एका भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्‍या 10 ते 15 गाड्यांनी घटनास्‍थळी धाव घेतली असून आग विझवण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. आज दुपारी 2 वाजण्‍याच्‍या सुमारास ही आग लागली.  या परिसरात केमिकल आणि भंगाराची गोदामे असल्‍यामुळे आग पसरण्‍याचा धोका आहे. ही आग पसरु नये म्‍हणून अग्निशमन दलाकडून कसोशिने प्रयत्‍न केले जात आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

तळोजा येथे टायरच्‍या गोदामाला आग
दुसरीकडे नवी मुंबईमध्ये तळोजा येथे टायरच्‍या गोदामाला भीषण आग लागल्‍याचे वृत्‍त आहे. अग्निशमनदलाच्‍या 3 गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या असून आगीवर नियंत्रण मिळवण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ आणि फोटोज..

बातम्या आणखी आहेत...