आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Interest Story Of 16 Year Lod Girl & Makeup Man Of Sunny Deol

सनी देओलच्या मेकअपमनने \'तिची\' आस्थेने चौकशी केली अन्...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- घरात सावत्र आई... वय वर्षे 16, साहजिकच तारूण्याकडे प्रवास... अशाच वेळी सावत्र आईकडून मानसिक व शारीरिक शोषण व छळ रोजचाच पाचवीला पूजलेला...वडिलांचेही दुर्लक्ष... त्यामुळे वर्ध्यात राहणारी वनिता (नाव बदलले आहे) अखेर ती वैतागते. आता तिला या घरातच राहावे वाटत नाही. जीव द्यावासा वाटतो पण त्यापेक्षा मुंबईत राहणा-या मामा-मामीकडे जायचा तिच्या डोक्यात विचार येतो. अखेर ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते.
गुरुवारी ती घरात कोणालाही काहीही न सांगता काही कपडे एका पिशवीत भरून रेल्वेने मुंबईकडे निघाली. दादरला उतरल्यानंतर तिला कुठे जावे हे कळेना. मामा-मामीला येणार हे कळविले नाही. सोबत ना मोबाईल ना मामाच्या घराचा पत्ता. तिची पर्स कोणीतरी चोरली होती. आता जवळ पैसेही नाहीत. पण ती मामाचे घर शोधत राहिली. अखेर ती जुहूत पोहचली. जुहूतील आठरावा रोडवर अभिनेता सनी देओलचा बंगला आहे. त्या बंगल्याच्या आसपास एक साध्या कपड्यातील मुलगी हातात पिशवी घेऊन इकडे-तिकडे पाहत फिरते आहे हे सनी देओलचे मेकअपमन असलेल्या हेमंत जाधव यांच्या लक्षात आले.
हेमंत यांनी तिची विचारपूस केली असता ती वर्धा येथून पळून आल्याचे त्यांना समजले. तिने तिच्या वडिलांचा तिच्याकडून तत्काळ मोबाईल क्रमांक घेतला व फोन लावला. तुमची मुलगी इकडे मुंबईत एकटीच आली आहे म्हटल्यावर त्यांना धक्का बसला तसेच ती सुखरूप असल्याने सुटकेचा निश्वासही सोडला. हेमंत जाधव व त्यांच्या एका मित्राने वनिताला जुहूतील पोलिस ठाण्यात नेले व पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, आपण आपल्या मुलीला घ्यायला येत असल्याचे वनिताच्या वडिलांनी हेमंत जाधव व पोलिस ठाण्यात सांगितले.
आणखी पुढे वाचा, हेमंत जाधव व त्यांचाय मित्राचे कौतुक केले जुहू पोलिसांनी....