आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीच्या परिस्थितीत माणुसकीचे दिसले झरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारने नोटबंदीचा आदेश जारी केल्यानंतर राज्यात हजारो लोकांचे हाल होत असताना माणुसकीचा परिचय देत अनेकांनी लोकांना मदतीचा हात दाखविला आहे. राज्यात सर्वत्र हॉटेल व्यावसायिकांनी जुन्या नोटा घेण्यास नकार देऊन ग्राहकांना परत पाठवणे सुरू केले असताना मीरा रोड येथील एका हॉटेल व्यावसायिकाने मात्र आपल्या ग्राहकाला परत न पाठविण्याचे व्रत अंगीकारले आणि ४ दिवसांनंतरही ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटांवर बंदी लादण्याची घोषणा ८ नोव्हेंबरच्या रात्री केल्यावर राज्यातील सर्व हॉटेल मालकांनी या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, अशा सूचना लावल्या. त्यामुळे हजारो ग्राहकांना हॉटेलमध्ये जाऊन काही खाणे वा चहापान करणे अशक्य झाले. अनेकांवर तर उपासमारीची पाळी आली.

अशावेळेस मीरा रोड येथील प्रीतम्स सर्व्हिंग सरप्रायजेस या हॉटेलने मात्र आम्ही जुन्या नोटाही स्वीकारणार अशी घोषणा ९ तारखेलाच केली. त्यामुळे या हॉटेलमध्ये अनेक जण येऊन आपली भूक भागवून जाऊ शकले. यापैकी काहींजवळ बिल देण्याइतकेही पैसे नव्हते तरी त्यांना पैसे मिळतील तेव्हा ते आणून देण्याची मुभा देण्यात आली. काहींनी ५०० च्या जुन्या नोटा दिल्या त्या स्वीकारून बाकी चिल्लर त्यांना देण्यात आली. प्रीतम्स जर असा उपक्रम करू शकत तर अन्य हॉटेल व्यावसायिक का करू शकत नाही, असा प्रश्न येथील लोक विचारत होते.

लोकांना उधारीही अपमानास्पद वाटते..
‘आम्ही लोकांना पैसे नसले तरी येऊन खाऊन जा, उधारी लिहून घेऊ, असे सांगूनही अनेकजण लाजत होते. कारण माणसाला एखाद्या मोठ्या वस्तू खरेदीसाठी पैसे उधार मागायला विशेष काही वाटत नाही. मात्र आपले पोट भरण्यासाठी कुणाला पैसे मागावे लागणे त्यांना अपमानास्पद वाटते. त्यामुळे अनेकांनी हॉटेलमध्ये येणेच टाळले. नोट बंदी पूर्णत: चुकीची असून त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय किमान ८० टक्क्यांनी कमी झाला, अशी प्रतिक्रिया जुन्या नोटा स्वीकारणाऱ्या प्रीतम्सचे मालक विनोद चंद यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...