आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म बदलण्यासाठी मुंबईत पत्नीवर ब्लेडचे शंभर वार, पती अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विवाहानंतर धर्म बदलण्यास नकार दिल्याने एका पतीने पत्नीवर तब्बल शंभर वेळा ब्लेडने वार करत तिला गंभीर जखमी केले. मुलुंड नुकतीच ही घटना उघडकीस आली आहे. बाझू उजेमान अकबर बादशहा ऊर्फ पाशा असे नराधम पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बाझू हा शिवडी येथील एका चाळीत राहतो. फेब्रुवारी महिन्यात त्याची आणि पीडित तरुणीची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर त्यांनी बांद्रे कौटुंबिक न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहाच्या काही दिवसांनंतर त्याने पत्नीकडे धर्म बदलण्याची मागणी केली. मात्र, बाझूचे खरे रूप कळाल्याने तरुणी त्याच्यापासून वेगळी राहू लागली.


काही दिवसांपूर्वी त्याने तिचे अपहरण करून ‘धर्म का बदलत नाहीस?’ असे म्हणत तिच्या शरीरावर ब्लेडने शंभर वार केले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून थेट मुलुंड पोलिस ठाणे गाठत बाझूविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.


बाझूवर 16 गुन्हे, वडील बॉम्बस्फोटातील आरोपी

बाझूची एकूणच पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या ठाण्यांत 16 गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच आपले वडील 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे त्याने कबूल केले आहे. पीडित तरुणीला बाझूची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.