आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाच्या मार्गातले अडथळे दूर होतील - उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उच्च न्यायालयाने गणेशोत्सवाच्या दरम्यान मंडप रस्त्यावर उभारू नयेत असे आदेश दिले आहेत. मात्र मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असल्याने शिवसेना-भाजपचे नेते मंडळाची समस्या सोडवण्यासाठी पुढे आले आहेत. यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न होऊ लागला आहे.
भाजप अामदार आशिष शेलार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्याची भेट घेऊन चर्चा केली. ‘गणेशोत्सवाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या पाठीशी आपणच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेना करत अाहे.