आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत पतीला तीन वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे :पत्नीचा क्रौर्याने छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पतीला ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मदन तुकाराम पाटील असे आरोपीचे नाव असून न्या. आर. एन. बावणकर यांनी त्याला ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
सुनीता आणि मदन यांचे २००३ मध्ये आंतरजातीय लग्न झाले होते. लग्नानंतर वर्षभरातच मदन हा व्यसनांच्या आहारी गेला. दरम्यान, यावरून सुनीता आणि मदनमध्ये अनेकदा वादही झाले. १ डिसेंबर २०१४ रोजी रात्री साडेअकरा वाजेदरम्यान मदन जेवत असताना सुनीताने व्यसन सोडण्याची विनंती केली.
पण, मदनने रागाच्या भरात तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेली कळशी फेकून मारली. मदन ऐकत नसल्याचे पाहून सुनीताने अंगावर रॉकेल ओतून आगकाडी पेटवली. मात्र, मदनने त्याकडे दुर्लक्ष केले. याचा मदनला काहीच फरक पडत नसल्याचे पाहून सुनीताने आगकाडी फेकून दिली.
परंतु, तिच्या साडीने पेट घेतला आणि ती गंभीररीत्या जळाली. उपचारादरम्यानच १५ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मदनची आई शोभा पाटील हीसुद्धा सुनीताचा छळ करत होती. २०१४ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. गुरुवारी न्यायालयाने याप्रकरणी निकाल देत मदनला ३ वर्षांच्या सश्रम कारावासासह ५ हजारांचा दंड ठोठावला.
बातम्या आणखी आहेत...