आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने पतीला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मानसिक अस्वस्थतेत कृत्य केल्याचा आरोपीचा दावा न्यायालयाने फेटाळला.
न्या. पी.डी. कोडे व न्या. विजया ताहिलरमाणी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरकारी पक्षाने आरोपी सीताराम हिरामण जोपळेचा गुन्ह्यातील सहभाग खंडपीठाने मान्य केला. शिक्षेविरोधात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना आरोपीने मानसिक अस्वस्थता दाखवणारा पुरावा सादर केला नसल्याचे
न्यायालय म्हणाले.


आरोपीने 7 जुलै 2005 रोजी आपल्या घरी पत्नी भारतीची हत्या केली होती. नाशिक सत्र न्यायालयाने या प्रकरणात जोपळेला 30 जून 2009 रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.