आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीनेच सुपारी देऊन केली पत्नीची निर्घृण हत्या, रस्त्यावरील खड्‍ड्यांनी समोर आणले सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विरारमधील रस्त्यावरील खड्ड्यांनी एका महिलेच्या हत्येचा गुंता सोडवला आहे. झाले असे की, महिलेच्या पतीनेच सुपारी देऊन तिची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपींचा गेम फसला. दोन आरोपी दुचाकीवरून मृतदेह घेऊन जात असताना रस्त्यावरील खडड्‍यांमुळे ते खाली पडले. लोक मदतीसाठी धावून आले असता आरोपींनी मृतदेह रस्त्यावरच सोडून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे.

काय आहे हे प्रकरण?
-मिळालेली माहिती अशी की, रमाबाई नामदेव पाटील (वय- 54) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये मागील 21 वर्षांपासून वाद सुरु होते. दोघे विभक्त राहात होते.
- नामदेव पाटील हा रेल्वेमध्ये गॅंगमनम्हणून नोकरी करतो. कोर्टने त्याला पत्नीला खावटी देण्याचे आदेश दिले होते. यामुळे नामदेव त्रस्त होता.  
- त्याने पत्नीची हत्या करण्‍याचा कट रचला. करझोन गावात राहाणारी वंदना लक्ष्मण पवार हिच्या मदतीने लक्ष्मण गोविंद कोबाड याला पत्नीच्या हत्येची अडीच लाख रुपयांत रुपारी दिली.

अशी केली पत्नीची हत्या...
- रविवारी दुपारी नामदेवने रमाबाईला करझोन गावातील एका फार्म हाऊसवर रुपये घेण्याच्या बहाण्याने बोलावले.  
- रमाबाई फार्म हाऊसवर पोहोचताच पांडुरंग जीवन कदम, चंद्रकांत गणपत पडवले, लक्ष्मण गोविंद कोबाड, लक्ष्मण जीवन पवार आणि त्याचा मुलगा राकेश लक्ष्मण पवार याने तिचा गळा आवळून हत्या केली.
-रमाबाईची हत्या करण्यापूर्वी मारेकर्‍यांनी तिला जेवू घातले होते.

रस्त्यांवरील खड्‍ड्यांमुळे फसला 'गेम'
- रमाबाईच्या मृतदेहाची अंधारात विल्हेवाट लावण्यासाठी निघालेल्या आरोपींचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेम फसला.
- आरोप रात्री 12 वाजेच्या सुमारास मृतदेह घेऊन दुचाकीने निघाले.  
- बुंधरपाडा येथील अंगणवाडीजवळ ते पोहोचले असता. खड्ड्यांमुळे ते दुचाकीवरून जमिनीवर पडले. मृतदेह रस्त्यावर पडल्याने गावतील कुत्रे भूंकायला लागले.  
- गावातील लोक रस्त्यावर आल्याचे पाहून आरोपींनी मृतदेह सोडून पळ काढला. गावकर्‍यांनी मृतदेहाबाबत पोलिसांना माहिती दिली.  
- पोलिसांनी अवघ्या 4 तासांत सर्व आरोपींना गजाआड केले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...