आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींकडून गौरव : हुतात्मा गणपत मडावी यांना शौर्यपदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने कायदा सुव्यवस्था राखताना जीवाची बाजी लावणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या देशातील ९६७ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर केली असून महाराष्ट्राच्या पोलिस विभागाने यंदा तब्बल ६८ पदकांची लयलूट करत बाजी मारली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्रालयाच्या वतीने विविध पदके जाहीर करण्यात येतात. शौर्य, उल्लेखनीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी अशा तीन विभागात पोलिस कर्मचारी-अधिकारी यांना पदके जाहीर करण्यात येत असतात, महाराष्ट्राच्या पोलिस विभागाला यंदा एक राष्ट्रपती शौर्य पदक, १९ पोलिस शौर्य पदके, ५ उल्लेखनीय कामगिरी राष्ट्रपती पदके आणि ४३ गुणवत्तापूर्ण कामगिरीची पोलिस पदके अशी एकंदर ६८ पदकांची लयलूट करत राज्याचे नाव देशात अग्रक्रमावर झळकावले आहे.

राष्ट्रपती शौर्यपदक : १. गणपत नेवरू मडावी, हेडकॉन्स्टेबल, (मरणोत्तर)
पोलिस शौर्यपदक : यंदा १९ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोलिस शौर्य पदकांवर नाव कोरले असून त्यामध्ये गिरीधर नागो अत्राम या पोलिस नाईकास मरणोत्तर पदक देण्यात आले आहे. तसेच यामध्ये सध्या पालघर जिल्‍ह्याचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक या एकमेव आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
उल्लेखनीय कामगिरीचे पदक
* के. एल. बिष्‍णोई, अतिरिक्त राज्य पोलिस महासंचालक, मुंबई.
* संजय बर्वे, अतिरिक्त पोलिस महासंचालक, रेल्वे, मुंबई.
* अशोक बागमारे, सहायक कमांडट, राज्य राखीव पोलिस दल, नागपूर.
* राजन पाली, पोलिस उपायुक्त, वर्धा
* सदाशिव पाटील, हेड कॉन्स्टेबल, कोल्हापूर.

बीडचे कारभारी, जालन्याचे काकडे, लातूरचे राजूरकर यांचाही सन्मान
यंदा राज्यातील ४३ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्ता पूर्ण कामिगिरीबद्दल पोलिस पदके बहाल करण्यात आली आहेत. त्यातील काही नावे.
१. सुरेशकुमार मेकला (आयुक्त, अमरावती), २. माधव कारभारी (उपायुक्त बीड), ३. छगन देवराज (उपायुक्त, नाशिक ग्रामीण), ४. ज्ञानदेव गवारे (उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, जळगाव), ५. गौतम गडमडे (निरीक्षक, एसआरपीएफ, अमरावती), ६. पंडित पवार (उप.निरीक्षक, सिन्नर), ७. दगडू अजिंठे (सहा. उपनिरीक्षक, नंदुरबार), ८. शिवाजी पाटील (सहा.उपनिरीक्षक, नाशिक, ग्रामीण), ९. साहेबराव सूर्यवंशी (सहा उपनिरीक्षक, नाशिक), १०. रमेश कोठे (सहा उपनिरीक्षक, नंदुरबार), ११. रमेश कावळे (सहा उपनिरीक्षक, नंदुरबार), १२. भगवान काकडे (सहा उपनिरीक्षक, जालना), १३. जनार्दन राजूरकर (सहा उपनिरीक्षक, लातूर) या अिधकाऱ्यांचा पदक पटकावणाऱ्यांमध्ये समावेश आहे.