आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतून परत येऊन भारतात भीक मागतात या महिला, फाडफाड बोलतात इंग्ल‍िश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताब्यात घेतलेल्या महिल्यांना पोलिसांनी आनंद आश्रममध्ये ठेवले आहे. - Divya Marathi
ताब्यात घेतलेल्या महिल्यांना पोलिसांनी आनंद आश्रममध्ये ठेवले आहे.

मुंबई- हैदराबादेत भिकार्‍यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांना दोन महिलांनी आश्चर्याचा धक्का दिला. तो म्हणजे असा की, या दोन महिलांनी पोलिसांसोबत चक्क इंग्रजीत हुज्जत घातली.

 

दरम्यान, तेलंगण पोलिसांनी 20 ऑक्टोबरपासून रस्त्यावर भीक भागणार्‍या महिला-पुरुषांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्पची कन्या हैदराबादच्या दौर्‍यावर 28 नोव्हेंबरला येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे कॅम्पेन राबवले आहे.

 

एक महिला अमेरिकेत करत होती नोकरी, दुसरीकडे होते ग्रीन कार्ड
- तेलंगण पोलिसांनी महिलाची चौकशी केल्यानंतर धक्कादायक महिती समोर आली. 50 वर्षीय फरजोना हिने सांगितले की, तिने बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये तिने ग्रॅज्युएशन केले आहे. लंडनमध्ये ती एका मोठ्या संस्थेत उच्चपदावर नोकरी करत होती. तिचा मुलगा अमेरिकेत आर्किटेक्ट आहे.

- फरजोना हिने सांगितले की, ती आनंद बागमध्ये राहाते. काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्याचा तिला प्रचंड धक्का बसला. मन:शांती मिळावी म्हणून एका मांत्रिकाने तिला दरगाह बाहेर भीक मागण्याचा सल्ला दिला.

- पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव राबिया बसेरा असे आहे. तिने सांगितले की, ती अमेरिकेतील ग्रीन कार्ड होल्डर होती. तिच्याकडे प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीवरून वाद सुरु असल्याने ती प्रचंड त्रस्त आहे. त्यानंतर तिला नातेवाइकांनी दरगाहबाहेर भीक मागण्याचा सल्ला दिला होता.

 

पोलिस 1000 भिकार्‍यांवर कारवाई...
तेलंगण पोलिसांनी डोनाल्ड ट्रम्पची कन्या इवांका ट्रम्प भारत दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर हैदराबादेतील भिकार्‍यांना दुसरीकडे हलवले जात आहे. भिकारी महिला आणि पुरुषांची रवानगी चेरलापल्ली तुुरुंगातील आनंद आश्रमात करण्यात हलवले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 1000 ताब्यात घेतले आहेत. त्यात 133 महिलांचा समावेश आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा..फरजोना आणि राबिया बसेराचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...