आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Hep B Sufferer Amitabh Bachchan ‏ Launching The Hepatitis B Campaign, With The Government Officialdom And The UNICEF

माझं यकृत 75 टक्के निकामी- बिग बींचा धक्कादायक खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकार आणि युनीसेफकडून चालवल्या जाणा-या डेपेटायसीस-बी विरोधी मोहिमेचे ब्रॅड अॅम्बेसेडर म्हणून अमिताभ यांची निवड करण्यात आली आहे. - Divya Marathi
केंद्र सरकार आणि युनीसेफकडून चालवल्या जाणा-या डेपेटायसीस-बी विरोधी मोहिमेचे ब्रॅड अॅम्बेसेडर म्हणून अमिताभ यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई- बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या तब्बेतीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. माझे यकृत 75 टक्के निकामी झाले असल्याची अतिशय गंभीर माहिती त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून चालवल्या जाणा-या डेपेटायसीस-बी विरोधी मोहिमेचे ब्रॅड अॅम्बेसेडर म्हणून अमिताभ यांना निवडले आहे. त्यासंदर्भातील कार्यक्रम सोमवारी मुंबईत पार पडला. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच बच्चन यांनी ही धक्कादायक माहिती दिली.
आपले यकृत कशामुळे निकामी होत चालले आहे याबाबतची माहिती देताना 73 वर्षीय अमिताभ म्हणाले, आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की 1982 साली कुली चित्रपटाचे शुटिंग करताना मी गंभीर जखमी झालो होतो. त्यावेळी माझ्या शरीरात 200 लोकांचे 60 बॉटल रक्त चढवले गेले होते. त्यातील एका व्यक्तीला हेपेटायसीस-बी ग्रस्त होते. त्याच्या रक्तातील जंतूमुळे मलाही या रोगाचा संसर्ग झाला. याबाबतची माहिती मला 18 वर्षानंतर म्हणजेच 2000 साली अनेक तपासण्यानंतर समजली. आता मी 73 वर्षाचा झालो आहे. माझे 75 टक्के यकृत निकामी झाले असून केवळ 25 टक्के भागच कार्यरत आहे. या 25 टक्क्याच्या यकृतावरच माझे आयुष्य सुरु आहे, अशी गंभीर माहिती दिली.

बच्चन पुढे म्हणाले, आमच्या लहानपणी ही लस नव्हती. तेव्हा ती उपलब्ध असती आणि मी ती लस टोचून घेतली असती तर आज मला हेपेटायसीस-बी या रोगाचा संसर्ग झाला नसता. मात्र, आता वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन झाली आहेत. बहुतेक रोगावर औषधे शोधण्यास जगभरातील शास्त्रज्ञांना यश येत आहे. मानवी आयुष्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आता तुम्ही व तुमच्या कुटुंबियातील लहान मुलांना योग्य उपचार व लस देऊन हेपेटायसीस-बी आजारावर मात करू शकता असेही बच्चन यांनी सांगितले.
पुढे आणखी वाचा...