आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Not Founded Party Only For The Game Raj Thakare

मराठी माणसांचीच डोकी फोडण्यासाठी पक्ष काढलेला नाही - राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मी आज काय बोलतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे; परंतु मी मराठी माणसांचीच डोकी फोडण्यासाठी पक्ष काढलेला नाही, तर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणार्‍यांना ठोकण्यासाठी पक्ष काढला आहे,’ असे रोखठोक प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले.

आमदार बाळा नांदगावकर यांच्या शिवडी मतदारसंघात विविध उपक्रमांचे उद्घाटन राज यांच्या हस्ते झाले. नरे पार्कमधील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या क्रीडा संकुलाला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे आज राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेवर व उद्धव ठाकरेंवर टीका होईल, अशी माध्यमांना आशा होती. मात्र राज यांनी उलट माध्यमांचाच समाचार घेतला. ते म्हणाले की, जनतेला क्रीडा संकुल हवे असेल तरच ते होईल. या क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये केवळ मराठी मुले-मुलीच डुंबतील, बाहेरचा कोणी आला तर त्याला बखोटीला धरून बाहेर काढा. मी कोणाला हवे असते म्हणून बोलत नाही, तर महाराष्ट्राला काय हवे ते मी बोलतो.