आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • I Am Not Taking Extra Government Benefit Says Ratnakar Gaikwad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवाजवी सरकारी लाभ घेतले नाहीत : रत्नाकर गायकवाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्य सचिवांना सरकार ज्या सोयी-सुविधा पुरवते, त्याच सेवांचा लाभ आपल्यालादेखील मिळाला. इतर कुठलेही लाभ आपण घेतलेले नाहीत. त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) माजी आयुक्त राहुल अस्थाना यांनी माझ्याविरोधात केलेले आरोप चुकीचे असल्याचे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

गायकवाड यांची एमएमआरडीएतून राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली झाल्यानंतरही त्यांनी एमएमआरडीएचे निवासस्थान सोडले नाही. त्या काळात त्यांचा वीजवापर व गॅसचा खर्च एमएमआरडीएला सोसावा लागला होता, असा आरोप अस्थाना यांनी केला होता. तशा आशयाचे पत्र त्यांनी त्यांच्या निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांना पाठवले होते.

या आरोपांना प्रत्त्युत्तर देताना आपण सरकारी सेवा-सुविधांचा कुठलाही अवाजवी फायदा घेतला नसल्याचे स्पष्ट करताना मुख्य सचिवांना सरकारी निकषांनुसार ज्या सोयीसुविधा मिळतात, त्याच आपल्यालाही मिळाल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. अस्थाना यांना निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी कशी काय जाग आली, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. आपण एमएमआरडीएचे आयुक्त असताना अस्थाना यांना त्यांच्या कूर्मगती कार्यपद्धतीबद्दल वेळोवेळी खडसावले होते. त्याच आकसातून त्यांनी असे हीन आरोप आपल्यावर केल्याचे गायकवाड यांनी या वेळी सांगितले.