आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Care Relation, But Now Obey Rajdharm Dhananjay Munde

नात्याची काळजी, पण आता राजधर्माचे पालन -पंकजावरील आरोपावेळी धनंजय भावुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माझे आरोप वैयक्तिक नाहीत. मला नात्याचीही काळजी आहे, पण आज मी या घरातील मोठा भाऊ आहे. त्यामुळे आता मला राजधर्माचे पालन करणे भाग आहे, असे भावुक उद्गगार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी काढले.कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य आणि आदिवासी विभागाच्या कंत्राटातील कथित भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे शरद रणपिसे व राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आदी सदस्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या चर्चेवर मुंडे बोलत होते.

काँग्रेसकडून शरद रणपिसे व भाई जगताप बोलले, तर राष्ट्रवादीकडून एकटे धनंजय मुंडेच बोलले. मुंडे यांचे घणाघाती भाषण तब्बल १ तास ५० मिनिटे चालले. प्रत्येक आरोपाला पुरावे हे मुंडे यांच्या या भाषणाचे वैशिष्ट्य राहिले. ‘रासप’चे महादेव जानकर खाली बसून मुंडे याच्या भाषणावर शेरेबाजी करत होते. तेव्हा धनंजय मुंडे त्यांना मध्येच थांबून म्हणाले, जानकर साहेब तुमचा मुंडे परिवारावर जरा अधिकच स्नेह आहे, याची चांगली माहिती आहे. मला सुद्धा नात्याची काळजी आहे. पण, आज राजधर्माचे पालन करतो आहे. आपली संस्कृती पाणी पाजणा-याची आहे. पण महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यासाठी घेतलेल्या वाॅटर प्युरिफायरमध्यही पाप केले. मापात जावू दे, पण पाण्यातसुद्धा पाप करण्याची माझ्यावर जर वेळ आली असती तर मी मरण पत्करले असते, असे मुंडे म्हणाले.

महिला बालकल्याण विभागाचे १६६ कोटींचे चिक्कीचे कंत्राटे ई-निविदा नसूनही कायम ठेवले. मात्र, आदिवासी विभागाचे वह्यांचे १८ कोटींचे कंत्राट ई-निविदा असूनही रद्द केले. कदाचित आदिवासी विभागाचे मंत्री विष्णु सवरा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री नसतील, त्यामुळेच त्यांना महिला व बालकल्याणपेक्षा वेगळा नियम लावला असावा, असा टोलाही मुंडेंनी पंकजा यांचे नाव न घेता लगावला.

मी विशिष्ट खात्याबाबतच सातत्याने आरोप करतो, अशी शंकाही घेतली जात आहे. परंतु माझे आरोप वैयक्तिक नाहीत. विनाेद तावडे, तुम्ही विरोधी पक्ष नेते होते. तेव्हा तुम्ही जे काम करत हाेतात, तेच काम मी आज करतो आहे, असा खुलासाही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात केला.

पुढे वाचा, लढाईतले क्षण