आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Congratulate HonNarendra Modi For Beti Bachao beti Padhao Mp Supriya Sule

आता सुप्रिया सुळेंकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानाबद्दल खासदा सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 2011 जणगणनेची आकडेवारी वाचून झालेल्या अस्वस्थतेतून "जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा" या उपक्रमाची आम्ही नायगाव ते पुणे अशी पदयात्रा काढून सुरुवात केली होती. त्या उपक्रमाचा आता देशपातळीवर जागर होत असल्याचा आपल्याला आनंद झाला आहे असेही सुळे यांनी म्हटले आहे.
अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्यासोबत समाजातील प्रत्येक घटक स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जागरात सामील झाला होता. त्याचे दृश्य परिणाम आता समोर येत आहेत. जोपर्यंत मुला-मुलींचे प्रमाण समान होत नाही, तोवर हा जागर असाच चालू राहणार आहे. पण या निमित्ताने समाजमन हळूहळू बदलते आहे, हे निश्चितच समाज परिवर्तनाचे द्योतक आहे. आज हा हा जागर देशभरात होतो आहे. यातून समाजाच्या जाणिवांच्या कक्षा नक्कीच विस्तारतील, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी मोदींनी सुरु केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे तोंडभरून कौतूक केले आहे.