आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा कार्यकर्ता म्हणून आबांची सदैव पाठराखण- शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आर.आर. पाटील यांची पार्श्वभूमी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहिलो, त्यातून समाजात योग्य तो संदेश गेला’, या शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्याची शुक्रवारी जाहीर प्रशंसा केली.

सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसच्या वतीने गौरव करण्यात आला. गृहमंत्री आर.आर. पाटील यांना ‘महासन्मान’, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना ‘महा-शिल्पकार’ तर माजी खासदार एकनाथ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी पवार यांनी राज्यात गुंतवणुकीसाठी वातावरण कसे चांगले राहील याची खबरदारी सर्वांनीच घेण्याचे आवाहन केले.

पक्षात पैसे, जात चालत नाही
सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले की, माझ्यासारख्या खेड्यातील, रोजगार हमी योजनेवर काम करून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलेल्या कार्यकर्त्याला आज शरद पवार साहेबांमुळे आणि पक्षामुळे प्रदीर्घ काळ गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आमच्या पक्षात तिकीट आणि संधी देताना पैसे व जात विचारली जात नाही म्हणून मी टिकून असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. या वेळी संजय भाटिया, एकनाथ ठाकूर या सत्कारमूर्तींनीही मनोगत व्यक्त केले.