मुंबई- फक्त सामान्य लोकांनाच नाही तर हायप्रोफाईल लोकांनाही लैंगिक शोषणाची शिकार ठरतात. भाजपच्या मुंबईतील खासदार आणि प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनाही अशाच त्रासाला सामोरे जावे लागले आहे. याबाबतचे भाष्य त्यांनी अहमदाबादमधील आयोजित कार्यक्रमादरम्यान केले. खासदार महाजन म्हणाल्या, "प्रत्येक महिलेला कधी ना कधी लैंगिक शोषणाला बळी पडावे लागते, अगदी मी ही त्यातून गेले आहे. आणखी काय म्हणाल्या पूनम महाजन.....
- खासदार पूनम महाजन यांनी रविवारी अहमदाबादमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयोजित एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, " घटना तेव्हाची आहे जेव्हा मी कार अफोर्ड करू शकत नव्हते. मी क्लासला जाण्यासाठी वर्सोवा ते वरळी असा मुंबई लोकलने प्रवास करायचे. मात्र, रस्त्यात आणि लोकलमध्ये लोक नेहमी वाईट नजरेने पाहायचे. असे जगातील महिलांना सोसावे लागते खासकरून भारतीय महिलांना हे नक्कीच झेलावे लागते."
- पूनम पुढे म्हणाल्या, अशा स्थितीत मी स्वत:ला बिचारी समजायची. राजकारणात सामान्य दर्जाचे पुरुष तुम्हाला दिसतील व त्यांच्याबाबत कोणालाच काही आक्षेप नसतो. मात्र, महिलांबाबत तसे नसते.
- महाजन म्हणाल्या, "महिलांना ताकदीची गरज असते आणि महिलांना स्वत:ला सिद्ध केले आहे. अमेरिकेत आजपर्यंत महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकली नाही पण भारतासारख्या देशात राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री झाल्या आहेत. काही बाबतीत आपण अमेरिकेच्याही पुढे आहोत."
कोण आहेत पूनम महाजन?
-पूनम भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची मुलगी आहे. प्रमोद अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिले होते.
-2014 च्या लोकसभा निवडणुकीत पूनम मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून खासदार म्हणून निवडून आल्या. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 1.86 लाखांच्या अंतराने हरविले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आणखी काही फोटोज...