आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Will Discuss Belgoan Issue With Pranabda Balasaheb

सीमाप्रश्नी प्रणवदांशी चर्चा करणार : ठाकरे; बेळगावकरांनी घेतली ‘मातोश्री’वर भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बेळगाव सीमाप्रश्नी राज्यातील सर्व महापौरांना घेऊन उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटतील तर राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी हे भेटायला येतील तेव्हा त्यांच्याकडे मी हा विषय काढेन, असे आश्वासन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रविवारी बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
न्यायालयाचा निर्णय झुगारून बेळगाव महापालिक बरखास्त केल्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बेळगावच्या महापौर सीमा बाळेंकुद्र, उपमहापौर रेणू किलेकर यांच्यासह तेथील मराठी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या वेळी नगरसेवकांनी कर्नाटक सरकारच्या जुलमाचा पाढाच बाळासाहेबांपुढे वाचला. तेव्हा बाळासाहेबांनी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी सुरू असलेल्या लढ्यात शिवसेना सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात बेळगाव महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी महाराष्ट्रातील महापौरांची भेट घेऊन अन्यायाविरोधात एकत्र आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी शिष्टमंडळाला केले. सीमाप्रश्नी केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे म्हणून शिवसेनेने राष्ट्रपतिपदासाठी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला असून 13 तारखेला त्यांच्याशी होणाºया भेटीत सीमावासीयांची कैफियत त्यांच्यापुढे मांडू, असे आश्वासनही ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, रविवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन बेळगाव महापालिका बरखास्त करण्याच्या निर्णयाबाबत राष्ट्रपतींशी चर्चा करून ही बरखास्ती रद्द करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली.
बाळासाहेब ठाकरे- प्रणवदा भेटीदरम्यान शरद पवारांची \'TEA DIPLOMACY\'ची इच्छा
बाळासाहेब, प्रणवदा भेट 13 जुलैला?
येडियुरप्पा हे तर भाजपमधील मानवी बॉम्ब- बाळासाहेब ठाकरे