आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमीच्या 'त्या' फरार दहशतवाद्यांचे टार्गेट मुंबई-पुणे बेल्ट? आयबीचा सतर्कतेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून आक्टोबर महिन्यात पळालेले सिमीचे सहा दहशतवादी मुंबई-पुणे परिसरात असण्याची शक्यता केंद्रींय गुप्तचर संघटनांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील नागरिकांनी व मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. हे दहशतवादी महाराष्ट्र, राज्यस्थान आणि कर्नाटकात हल्ले करण्याची तयारीत असल्याची माहितीही आयबीने दिली आहे. नागरिकांनी दक्ष राहावे यासाठी संबंधित 6 दहशतावद्यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यांची माहिती दिल्यास बक्षीस देण्याचेही पोलिसांनी जाहीर केले आहे.
खांडवा येथील कारागृहातून 1 ऑक्टोबर 2013 रोजी असलम अय्यूब, जाकीर हुसेन सादीक, महबूब गुड्डू, अमजद रमजान खान, मोहम्मद एजाउद्दीन आणि फैझल हे सहाजण 14 फूट उंचीच्या भिंतीवरून उडी टाकून पळाले आहेत. हे दहशतवादी मुंबई परिसरात लपल्याची शक्यता गुप्तचर संघटनांनी व्यक्त केली आहे. या दहशतवाद्यांनी भारत-पाकिस्तान सीमेवर सक्रिय असणा-या दहशतवादी संघटनांशी बातचित झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या दहशतवाद्याचे शेवटचे लोकेशन कर्नाटकात आढळून आले आहे. मात्र ते वारंवार आपली जागा बदलत आहेत. राजस्थान, महाराष्ट्र व कर्नाटक परिसरात त्यांचा वावर आहे. पाकिस्तानी संघटना आयएसआयच्याही हे दहशतवादी संपर्कात असून ते कधीही घातपात घडवतील असे आयबीने आपल्या म्हटले आहे.
गुप्तचर संघटनांच्या इशा-यानंतर मुंबई पोलीस कामाला लागले आाहेत. सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. मुंबई-ठाणे, पुणे व नाशिक या त्रिकोणी बेल्टवरही बारीक लक्ष्य ठेवण्यात येत आहे. या बेल्टमध्येच हे दहशतवादी आपला मुक्काम ठेवू शकतात. सर्व घडामोडी पाहता मुंबईसह ठिकठिकाणी दहशतवाद्यांची छायाचित्रे असणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. कुणालाही असे तरुण कुठेही दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले असून माहिती देणार्‍यास बक्षीसही दिले जाणार आहे.
पुढे वाचा, मुंबईतील विशेष भागांवर पोलिसांची करडी नजर, कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी सुरु...