आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I&B Minister Manish Tewari Granted Bail By Mumbai Court In A Defamation Case Filed By Ex BJP President Nitin Gadkari

नितीन गडकरींना 10 हजारांचा बॉड मनिष तिवारींनी लिहून द्यावा, हायकोर्टाचे निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना 10 हजार रूपयांचा बॉंड लिहून द्यावा असा निर्देश मुंबईतील किल्ला कोर्टाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांना दिला आहेत. मुंबईत 2010 साली उजेडात आलेले वादग्रस्त आदर्श सोसायटीत गडकरींचा बेनामी फ्लॅट असल्याचा आरोप तिवारींनी केला होता.
2010 मध्ये ‘आदर्श’ घोटाळ्यात काँग्रेसच्या अनेक नेतेमंडळींची नावं पुढे आल्यानंतर त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितीन गडकरींना तिवारींनी ‘टार्गेट’ केले होते. भाजपचे राज्यसभेतील खासदार अजय संचेती, चैनसुख संचेती अशी लिंक जोडत सुधाकर मडके या ड्रायव्हरच्या नावावर असलेला फ्लॅट गडकरींचाच आहे, असा दावा तिवारी यांनी केला होता. मात्र, गडकरींनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपला आदर्शमध्ये कोणताही बेनामी फ्लॅट नाही असे सांगत तिवारींनी आरोप सिद्ध करावेत अथवा माफी मागावी नाहीतर आपण त्यांना कोर्टात खेचू अशी भूमिका घेतली होती. मात्र, तिवारींनी ना माफी मागितली ना आरोप सिद्ध केले. त्यानंतर गडकरींनी तिवारींनी आपली व आपल्या पक्षाची (पक्षाचे अध्यक्ष या नात्याने) बदनामी केल्याचे सांगत तक्रार दाखल केली होती. तसेच तिवारींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
अखेर तीन वर्षानंतर यावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तिवारींना 10 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे तिवारींना गडकरी यांना 10 हजार रूपयांचा बॉंड लिहून द्यावा लागणार आहे.