आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ICC Launch Tender, About Media Rights Issue, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसीने विक्री काढले 'मीडिया प्रक्षेपण हक्क'; आठ वर्षांसाठी निविदा जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फुटबॉल आणि ऑलिम्पिकनंतर जगातील लोकप्रिय क्रीडा प्रकार असलेल्या क्रिकेट या खेळाच्या 2015 ते 2023 या आठ वर्षांच्या कालावधीसाठीचे आयसीसीच्या स्पर्धांचे ‘मीडिया’ प्रक्षेपण हक्क विकण्यासाठी आज आयसीसीने निविदा काढल्या. आठ वर्षांच्या या कालावधीत आयसीसीचे दोन विश्वचषक, दोन ट्वेंटी-20 विश्वचषक आणि एक आयसीसी चॅम्प्यिनशिप स्पर्धा या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. 2015मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये होणार्‍या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपासून हा कालावधी सुरू होत आहे.
2007 ते 2015 या कालावधीत आयसीसीने आपल्या स्पर्धांच्या हक्काच्या विक्रीचे सुमारे दीड अब्ज डॉलर्स मिळविले होते. क्रिकेट या खेळाची त्यानंतर व्याप्ती वाढली आहे. अलीकडेच बांगलादेशात झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे प्रक्षेपण 200 देशांत 20 भाषांमध्ये करण्यात आले होते. जगातील 25 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचणार्‍या क्रिकेट या खेळाची वाढती लोकप्रियता पाहता, आगामी विश्वचषक स्पर्धा पाहणार्‍यांचा आकडा 2 अब्जांवर पोहोचेल, असा अंदाज आहे.
आयसीसीच्या अर्थ व वाणिज्य व्यवहार समितीचे चेअरमन जाइल्स क्लार्क म्हणाले, ‘मीडिया’ प्रक्षेपण हक्क विक्रीमुळे येणार्‍या उत्पन्नाचा खेळाच्या विकासासाठी उपयोग करण्यात येईल, तसेच सदस्यांनाही त्यातील वाटा देण्यात येईल.
त्याशिवाय आयसीसीचे ट्वेंटी-20, विश्वचषक या प्रकारांच्या दोन-दोन पात्रता स्पर्धांचे मीडिया हक्कही देण्यात येतील. महिलांच्या विश्वचषक व ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा व 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ज्या दोन-दोन वर्षांनी होतात, त्या प्रसारणाच्या हक्कांचाही यात समावेश आहे.