आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उणे 10 तापमानातील ‘आइस गणेश’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळे देखावे करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधणा-या मुंबईच्या गणेशोत्सवात यंदाचे आकर्षण असेल ते ‘आइस वर्ल्ड’चे. स्नो वर्ल्डचे प्रमुख, उद्योगपती राजेंद्र जैन यांच्या सहकार्याने कुर्ला येथील गणेश मंडळाने सुमारे 600 किलो बर्फापासून गणेशाच्या तीन मूर्ती तयार केल्या आहेत. त्याची उंची 4 फूट आहे.


उणे 10 अंश सेल्सियस कृत्रिम तापमान तयार करून या मूर्ती भक्तांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या वातावरणात थांबणारे कार्यकर्ते व भाविकांसाठी उबदार जॅकेट्स, बूट्स, ग्लोज यासारख्या वस्तूंचीही सोय मंडळातर्फे करण्यात आली आहे. तसेच दररोज कापुराने आरती करण्यात येणार आहे.


गतवर्षी आम्ही बर्फाची छोटी मूर्ती तयार केली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद व या वर्षीच्या मूर्तीबाबत भाविकांमध्ये असलेली उत्सुकता पाहून आम्ही यंदा बर्फाच्या तीन मूर्ती तयार केल्या असल्याचे फ्रिजिंग रेन्स अ‍ॅट स्नो वर्ल्डचे संचालक राजेंद्र जैन यांनी सांगितले.