आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जजसमक्ष बलात्काऱ्याची पहिल्यांदाच रुग्णालयात अाेळखपरेड, मुंबईत प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आजवर बलात्कार प्रकरणातील आरोपींची ओळख परेड ट्रायल कोर्टासमाेर होत आली आहे. पीडित अल्पवयीन मुली सोडाच, मोठ्या मुली तसेच महिला या ओळख परेडवेळी अक्षरश: घाबरून जात असल्याने आरोपींना संशयाचा फायदा मिळत असे.मात्र, न्यायाधीश आणि डाॅक्टरांसमोर ओळख परेड घेण्याच्या कोर्टाच्या निणयाची यशस्वी अंमलबजावणी राज्यात प्रथमच मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सायन लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये झाली.
गेल्या महिन्यात वडाळ्याच्या झोपडपट्टीत एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन ४ वर्षीय मुलीला उचलून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला होता. या मुलीला उपचारासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले होते. तिने उपचाराला प्रतिसाद दिल्यानंतर याच ठिकाणी आरोपीची ओळख परेड घेण्यात अाली. पीडितेने आरोपीला अचूक ओळखले. या नव्या पद्धतीमुळे राज्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढणार आहे.

पोलिस, तहसीलदार, न्यायाधीश उपस्थित
अल्पवयीन मुलीची ओळख परेड गेल्या आठवड्यात २४ जूनला झाली. या वेळी डाॅक्टर तसेच पोलिसांसोबत तहसीलदार, जिल्हा न्यायाधीश उपस्थित होते. त्यांच्यासमोर एकूण ६ जणांना ओळख परेडसाठी उभे करण्यात आले. त्यातील आरोपीला पीडितेने अचूक ओळखले.
‘लोकमान्य’चे वन स्टाॅप ठरले टाॅप वन
निर्भया प्रकरणानंतर २०१३ मध्ये सरकारने पीडितेला आधार मिळावा यासाठी मनपा, सरकारी रुग्णालयांत वन स्टाॅप विभाग स्थापण्याचा निर्णय घेतला. येथे आधी तज्ज्ञ डाॅक्टरांकडून पीडितांची तपासणी होते. मोफत उपचार तसेच मानसोपचार तज्ज्ञांद्वारे आत्मविश्वास निर्माण केला जातो. लोकमान्य टिळक रुग्णालयात वर्षभरात ४७ पीडितांना अाधार दिल्याची माहिती वन स्टाॅपचे समन्वयक अधिकारी डाॅ. राजेश डेरे यांनी दिली.
भीतीमुळे ओळख पटण्याचे प्रमाण कमी
बलात्कार प्रकरणातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त पीडिता घाबरून त्या आरोपीचे पुन्हा तोंडही बघायला तयार नसत. त्यामुळे पोलिस ठाणे तसेच ट्रायल कोर्टासमोर अाराेपींची ओळख परेड यशस्वी होत नसे. परिणामी आरोपींना संशयाचा फायदा मिळून ते कायद्याच्या कचाट्यातून सुटून जात.
बातम्या आणखी आहेत...