आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If AIB Roast Was Vulgar And Violated Laws, Will Act, Says Maharashtra Chief Minister Fadnavis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'एआयबी नॉकआउट्स' अश्लील असल्यास कारवाई करणार - मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अश्लीलतेचा कळस गाठणार्‍या "एआयबी नॉकआउट्स' या कार्यक्रमाविरोधात विविध राजकीय पक्ष सरसावले असून अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम अश्लील असेल किंवा त्यात बेकायदा बाबींचा समावेश असेल तर त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर मनसेच्या चित्रपट सेनेने रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि करण जोहर यांनी या प्रकरणी माफी मागावी; अन्यथा यापुढे त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक बाबींचा ऊहापोह केला असून वरकरणी नैतिकता बाळगणार्‍या कलाकारांचे अश्लील रूप यात पाहायला मिळत आहे. २० डिसेंबरला वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात "एआयबी नॉकआऊट रोस्ट ऑफ रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर' हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बॉलीवूडचा चित्रपट दिग्दर्शक करण जोहर तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट्ट, रोडीज फेम रघू आदी उपस्थित होते. या ‘शो'मध्ये जाहीर मंचावरून परस्परांना उद्देशून अश्लील शेरेबाजी, विनोद सुरू होते. अभिनेत्यांनी तर अश्लीलतेचा कळस गाठला होता; परंतु अभिनेत्रीही अश्लील शेरेबाजीला हसून तितक्याच दिलखुलास दाद देत होत्या. यू ट्यूबवर हा शो पाहिल्यानंतर कलाकारांचा खरा चेहरा लाेकांसमोर आला आहे.

पुढे वाचा, शो रोखता येणार नाही : तावडे