आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांची तूर केंद्रावर खरेदी केल्यास कारवाई; राज्यमंत्री प्रवीण पोटे यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यात नाफेडद्वारे तूर खरेदीची केंद्रे सुरू करण्यात अाली आहेत. किमान आधारभूत खरेदी दराने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यास शासन कटिबद्ध आहे. केवळ शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करावी, असे आदेश सरकारतर्फे देण्यात आले आहेत. या केंद्रांवर जर व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी केल्याचे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.  

खरीप हंगाम २०१६-१७ आणि ५,०५० रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किमतीने तूर खरेदी करण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाफेडद्वारे अमरावतीत ५ तालुक्यांत ५ केंद्रावर, विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनमार्फत तीन तालुक्यांत ३ केंद्रे, व्हीसीएमएसद्वारे भारतीय खाद्य निगम यांची २ तालुक्यांत २ केंद्रे सुरू आहेत. आजतागायत १२ हजार ३७२ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे.  

सदर केंद्रावर फक्त शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात यावी, असे निर्देश पोटे यांनी दिलेे. शेतकऱ्यांचा हक्क हिरावून व्यापाऱ्यांनी आणलेली तूर खरेदी केंद्रावर खरेदी केल्याचे आढळल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...