आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Do Government Work Fastly, Then I Accept Mistake Pankaja Respond Dhananjay

गतिमान कारभार ही चूक असेल तर ती मला मान्य, पंकजांचे धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘२०१० मध्ये महिला व बालकल्याण विभागाने एकाच दिवशी १४ जीआर काढले होते. तेव्हा मी मंत्री नव्हते. मग, आम्ही २४ जीअार काढले म्हणून बिघडले कुठे ?,’ असा सवाल करत ‘गतिमान कारभाराला तुम्ही चूक म्हणत असाल तर मला ती चूक मान्य आहे,’ असे प्रत्युत्तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय यांचे नाव न घेता गुरुवारी दिले.

पंकजा म्हणाल्या, लाडूचा प्रस्ताव असताना चिक्की खरेदी केल्याचा आरोप चुकीचा आहे. लाडू बनवताना मानवी स्पर्श होतो. त्यामुळे संपूर्ण यंत्रावर बनणा-या चिक्की खरेदीचा निर्णय आम्ही घेतला. खाण्यास अयोग्य असूनही आम्ही चिक्की खरेदी केली म्हणणे चुक आहे. एक अहवाल चिक्की अयोग्य, तर दुसरा खाण्यायोग्य म्हणतो. म्हणून चिक्कीचे नमुने तिस-या अहवालासाठी पाठवले अाहेत.

पुढे वाचा, पंकजांची टाेलेबाजी