आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दादा, मामा’ लिहिल्यास चालकास हजार रुपये दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहनांच्या नंबर प्लेट फॅन्सीवर दादा, मामा, बाबा असे शब्द लिहिल्यास वाहन चालकाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल. अशा नंबर प्लेटवर कारवाई करण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत दंड वाढविण्याबाबत निवेदन दिले. दरम्यान, अजित पवार यांनी फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवर पाच ते दहा हजार रुपये दंड आकारावा, अशी सूचना केली.

रावते म्हणाले, मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम २०० खाली राज्य शासनास असलेल्या अधिकारान्वये वाहन चालकांनी केलेल्या गुन्ह्याबाबत दंड केला जातो, परंतु ही रक्कम किरकोळ असल्याने बेशिस्तीचे प्रमाण वाढले होते. बेशिस्तीवर नियंत्रण आणण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यावर अजित पवार यांनी अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर एक हजार रुपयांऐवजी पाच किंवा दहा हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुधारित निवेदन देता येईल का, अशी विचारणा केली.

आयटीआयच्या विद्यावेतनात पाचशे रुपये वाढ : आयटीआयच्या विद्यावेतनात दरमहा पाचशे रुपये वाढ करण्यात येईल. मुलींच्या आयटीआयची संख्या वाढवण्यात येईल तसेच रिक्त पदेही लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी विधानसभेत दिली. अामदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला हाेता. त्यावर निलंगेकर म्हणाले ‘आयटीआयमधील पन्नास टक्के प्रशिक्षणार्थींना सध्या ३३ वर्षापूर्वीच्या नियमाप्रमाणे ४० आणि ६० रूपये विद्यावेतन देण्यात येते. त्यात वाढ करून त्याची रक्कम रुपये ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव अाहे.’
हेल्मेट न घातल्यास अाता पाचशे रुपये दंड
नव्या नियमानुसार, विनाहेल्मेट, विनापरवाना वाहन चालवणे, शारीरिक, मानसिकदृष्ट्या अपात्र असताना गाडी चालविणे, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन करणे या गुन्ह्यांसाठी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. वाहनांच्या नंबर प्लेट विहित पद्धतीने न लिहिणे, रिफ्लेक्टर्स- टेललाइट नसणे, अनधिकृत व्यक्तीस वाहन देणे, अतिवेगाने- धोकादायकपणे वाहन चालवणे, वाहनात अवैध बदल करणे, विनानोंदणी दुचाकी वाहन चालवणे यापैकी होणाऱ्या वाहतूक गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वाहनांची शर्यत लावणे, विनानोंदणी चारचाकी वाहन चालवणे, विमा नसताना वाहन चालवणे या गुन्ह्यांसाठी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अाजवर हेल्मेट न घातल्यास केवळ १०० रुपये दंड अाकारला जात हाेता.
बातम्या आणखी आहेत...