आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तला शस्‍त्रे दिल्‍यानंतर दाऊदने भावाला चोपले होते, X- CP चा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरज कुमार - Divya Marathi
नीरज कुमार
मुंबई - कुख्‍यात अंडरवर्ल्‍ड दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनीस याने बॉलीवुड स्‍टार संजय दत्‍त याला शस्‍त्रे दिली. हे दाऊदला कळताच त्‍याने आपला भाऊ अनीस याला बेदम मारहाण केली होती, अशी माहिती दिल्लीचे माजी पोलिस आयुक्‍त नीरज कुमार यांनी आपल्‍या ‘डायर डी फॉर डॉन’ या पुस्‍तकात दिली आहे. येत्‍या शनिवारी (21 नाव्‍हेंबर) या पुस्‍तकाचे प्रकाशन होणार आहे.
आपले दाऊदसोबत अनेक वेळा संभाषण झाले होते, अशी माहिती कुमार यांनी त्‍यांच्‍या या पुस्‍तकात दिली आहे. एक वेळ दाऊद कुमार यांना म्‍हणाला, “काय साहेब, तुम्‍हाला वाटते का, मुंबईमध्‍ये मी साखळी बॉम्‍बस्‍फोट केले ?” असे अनेक प्रसंग या पुस्‍तकात आहेत. त्‍यातील काही निवडक किस्‍से खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
मुंबई पोलिस आयुक्‍तांनी दाऊदला फटकारले होते
कुमार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, मुंबई बॉम्‍बस्‍फोटानंतर दाऊदने आपल्‍याला तीन वेळा फोन कॉल केला. दरम्‍यान, या तीनही संभाषणात त्‍याने सांगितले की, यात त्‍याचा काहीच सहभाग नाही. तसेच माझ्यापूर्वीच्‍या तत्‍कालीन आयुक्‍तांनाही त्‍याने हेच सांगितले होते. पण, त्‍यांनी दाऊदला फटकारले असल्‍याची माहिती खुद्द दाऊद यानेच दिली.
दाऊदने नीरजकुमार यांना काय म्‍हटले होते
नीरज कुमार यांच्‍या पुस्‍तकानुसार, “दाऊद माझ्यासोबत मुंबई स्‍टाइलने बोलला. त्‍याच्‍या बोलण्‍यात भय नव्‍हते. शिवाय मला खूश करण्‍याचा प्रयत्‍नही तो करत नव्‍हता. त्‍याने एक वेळ म्‍हटले साहेब, मी काही सांगण्‍यापूर्वी तुम्‍हीच सांगा की, तुम्‍हाला वाटते का की मी मुंबईमध्‍ये साखळी बॉम्‍बस्‍फोट घडवून आणले आहेत?”
नीरज कुमार यांनी दिले असे उत्‍तर
कुमार यांच्‍यानुसार , ''माझ्या प्रश्‍नाचे उत्‍तर तू आणखी एक प्रश्‍न विचारून का देत आहे. मी काय विचाराशी तुझे काही घेणे-देणे नाही. तुला तर काही सांगायचे आहे तर ते सांग. ”
संजय दत्तला कसे मिळाले होते ‘डी’ कंपनीकडून शस्‍त्रे
कुमार यांच्‍यानुसार त्‍यांनी दाऊदला विचारले, “तुझा लहान भाऊ अनीस याने संजय दत्‍तला शस्‍त्रे पाठवली, हे तुला मान्‍य आहे का ?” त्‍यावर दाऊदने ही गोष्‍ट मान्‍य केली. अनीस आणि संजय दत्त यांच्‍यात ‘यल्‍गार’ चित्रपटाच्‍या शूटिंगदरम्‍यान जवळीकता वाढली. दुबईत हे चित्रकिरण सुरू होते. आपल्‍या कुटुंबाच्‍या सुरक्षेसाठी संजय दत्‍तने त्‍याच्‍याकडे शस्‍त्रे मागितले होते. याच प्रकरणात संजय याला शिक्षा झाली.
दाऊनने अनीस बेदम चोपले
संजय दत्‍तला अनीस शस्‍त्रे दिलीत याची माहिती दाऊदला मिळताच त्‍याला प्रचंड राग आला. त्‍याने अनीसला बोलावून घेतले आणि बेदम चोन दिला, असाही उल्‍लेख या पुस्‍तकात आहे. शिवाय मुंबई साखळी बॉम्‍बस्‍फोट दाऊदचा हात असल्‍याचे अनेक पुरावे मुंबई पोलिसांकडे असल्‍याचा दावाही कुमार यांनी आपल्‍या पुस्‍तकात केला.

‘रिटायर होत आहात साहेब, आता तरी सोडा छोड़ो’
कुमार वर्ष 2013 मध्‍ये आयपीएल स्‍पॉट स्पॉट फिक्सिंगची चौकशी करत होते. दरम्‍यान, अचानक एका अनोळखी क्रमांकावरून त्‍यांच्‍या खासगी मोबाइलवर कॉल आला. पलीकडून दाऊद होता. तो म्‍हणाला, “काय साहेब, तुम्‍ही रिटायर होत आहात, आता तरी पाठलाग करू नका,” अशी आठवण कुमार यांनी पुस्‍तकात सांगितली.