आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Joke On Athavale, Then We Will See You RPI Warning

आठवलेंची टिंगल कराल तर बघून घेऊ; ‘रिपाइं’चा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘रिपाइं’चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले जसे चित्रविचित्र वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत तसेच ते शीघ्रकाव्यासाठीही प्रख्यात आहेत. गल्लीतल्या सभांपासून ते संसदेतील भाषणांपर्यंत आठवलेंच्या शीघ्रकविता सर्वांच्या ओठावर असतात.

आपल्या नेत्याच्या या चारोळ्यांना जे कार्यकर्ते आजपर्यंत टाळी देत होते, तेच कार्यकर्ते आता ‘कवी आठवलें’चा काव्याला वैतागले आहेत. त्यामुळे आठवलेंच्या नावे सोशल मीडियावर विडंबन करणा-यांना बघून घेण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे.
निवडणूक प्रचारसभांमध्ये आठवलेंच्या चारोळ्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. पण त्याच काव्यांतून आता त्यांची सोशल मीडियातून टिंगलही उडवली जात आहे. ‘सहज आठवले’ नावाने अनेक शीघ्रकवी मोठ्या संख्येने कवितांचा रतिब घालत आहेत. नेमकी हीच गोष्ट रिपाइं कार्यर्त्यांना डाचते आहे. त्यामुळे वैतागून रिपाइंच्या युवक आघाडीने नुकतेच एक पत्रक जारी केले असून ‘शीघ्रकवींनी रामदास आठवले यांच्या काव्याचे विडंबन थांबवावे. अन्यथा त्यांचा रिपाइं स्टाईलने बंदोबस्त केला जाईल’, असा इशारा प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

पुढे वाचा 'विडंबनाला जातीय वास'