आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन केल्यास चालक, मालकावर गुन्हे - परिवहनमंत्री दिवाकर रावते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रक आणि बसच्या चालकांसह त्या वाहनांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असून वेळप्रसंगी त्यांचे वाहन परवाने निलंबित केले जाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. राज्य रस्ता सुरक्षा परिषद समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते. मद्यपी वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील दोन्ही टोलनाक्यांवर अल्कोमीटर बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री राम शिंदे, विजय देशमुख, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्यासह वाहतूक व बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रावते म्हणाले की, ‘राज्यातील ८५ टक्के अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर महिन्यातून दोन वेळा महामार्ग पोलिस आणि आरटीओ यांच्यामार्फत वाहनचालकांची व वाहनांची संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरून अवैध वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर ट्रक व बसच्या वाहनचालकांना आठ तासांपेक्षा अधिक तास काम देऊ नये यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यापुढे नव्याने बनविण्यात येणाऱ्या महामार्गांच्या निविदा प्रक्रियेमध्ये महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड गन, तसेच स्पीड कंट्रोल यंत्रणा उभारण्याच्या तरतुदींबरोबरच एखाद्या लेनवर अपघात झाल्यास त्याची वाहनचालकांना माहिती देणारे इंडिकेटर लावण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी अटी घालण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या अपघाताचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून अपघातांचे नियंत्रण करण्यासाठी या बैठकीत दूरगामी योजनांवर या बैठकीत चर्चा झाली.

यामध्ये तीन आणि चार क्रमाकांची लेन ही ट्रक आणि बससाठी वापरणे, उजव्या बाजूकडील लेन ही फक्त ओव्हरटेक करण्यासाठी ठेवणे आदि बाबींच्या समावेश असल्याचेही रावते यांनी यांनी सांगितले.
पुढे वाचा... मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर सीसीटीव्हीचे जाळे; वाहतूक नियंत्रणासाठीही यंत्रणा
बातम्या आणखी आहेत...