आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Minority Declared VHP, Then Helping Sanatan Minister Nasim Khan

अल्पसंख्यांक ठरल्यास विहिंप, सनातनलाही मदत - नसीम खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मदरशांना अनुदानाची घोषणा करताच विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. त्यावर ‘विश्व हिंदू परिषद आणि सनातन संस्था अल्पसंख्यांक ठरल्यास त्यांनाही अर्थिक मदत दिली जाईल’, असे प्रत्त्युत्तर अल्पसंख्यांक मंत्री नसीम खान यांनी दिले.


शाळांना अनुदान नाही : राऊत
शिवसेनेचे विनायक राऊत म्हणाले, राज्यात 1999 पासून तीन हजार मराठी शाळा कायम विनाअनुदान तत्वावर सुरू आहेत. या शाळांना अनुदान मंजूर होऊनही ते देण्यात आले नाही. मराठी शाळांसाठी राज्य शासनाजवळ निधी नाही. मात्र, मदरशांसाठी शासनाच्या कोषात निधीची कमतरता नाही.


यावर नसीम खान म्हणाले की, सरकारने अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. विरोधकांनी त्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. इतर संस्थांनीही अशा शाळा सुरूकेल्या आणि ते अल्पसंख्यांक असतील तर सरकार त्यांनाही आर्थिक मदत देईल.