आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Our Family Doesn\'t Get Security,why Should We Fight For Nation : Solider;s Question

‘कुटुंबास संरक्षण मिळत नसेल तर देशासाठी का लढावे?’ : सैन्यदलातील जवानाचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- जातीपातीच्या बेड्या कधी तुटणार आहेत? सवर्ण तरुणीशी प्रेम केले म्हणून जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळत असेल, निर्घृण हत्येला सामोरे जावे लागत असेल, तर कसला कायदा? असा संतप्त सवाल विचारला आहे. नगर जिल्ह्यातील सोनई येथे झालेल्या हत्याकांडातील मृत संदीप थनवारचा भाऊ पंकज थनवारने. तो सैन्यदलातील जवान असून पाकिस्तान सीमेवर तैनात आहे.

शत्रूंविरोधात लढत असताना कुटुंबीयांना गावात दहशतीचा सामना करावा लागणे खेदजनक असून त्यांना संरक्षण मिळेल की नाही, असा सवालही त्याने आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांना विचारला.