आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमान असल्यास शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून दाखवावे, शरद पवार यांची बोचरी टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर शुक्रवारी राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले. सहकारी पक्षांसोबत युती म्हणून सोबत राहण्यास भाजपला खंत वाटत असल्याने शिवसेना नाराज झाली, तर शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. उद्धव ठाकरे यांच्यात खरेच स्वाभिमान उरला असेल तर त्यांनी सत्तेमधून बाहेर पडून दाखवावे, असे अाव्हान पवारांनी दिले.

सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बाेलताना पवार म्हणाले, ‘मित्रपक्षांसाेबत सत्तेत राहण्याची खंत अमित शहा जाहीरपणे बाेलून दाखवतात. साहजिकच हे त्यांनी शिवसेनेबद्दल म्हटले आहे. पण, मुळात ज्यांच्यामुळे शहांना खंत वाटते त्यांच्यात काही स्वाभिमान आहे की नाही? काही स्वाभिमान असेल तर ते सत्तेत राहणार नाहीत. कारण, स्वाभिमानी माणूस भाजपसोबत बसणार नाही.
पुढे वाचा.. बाळासाहेबांच्या काळी शिवसेनेत स्वाभिमान होता.