आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IIT Entrance Result News In Marathi, Kapil Vaidya, Shalaka Kulkarni, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआयटी प्रवेश परीक्षेत कपिल वैद्य, शलाका कुलकर्णी राज्यात अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला येथील कपिल वैद्य आई- वडील व शिक्षक डॉ. नितीन ओक यांच्यासह. - Divya Marathi
अकोला येथील कपिल वैद्य आई- वडील व शिक्षक डॉ. नितीन ओक यांच्यासह.
मुंबई - अकोल्याचा कपिल वैद्य व ठाण्याची शलाका कुलकर्णी आयआयटी प्रवेश परीक्षेत राज्यात अव्वल ठरली आहेत. कपिलने ऑल इंडिया रँकिंगमध्ये थेट 13 व्या स्थानावर झेप घेतली, तर शलाकाने 87 वा क्रमांक पटकावत राज्यात मुलींमध्ये पहिली येण्याचा मान मिळवला आहे. हे दोघेही पेस अकॅडमीचे विद्यार्थी असून यंदा आयआयटीत महाराष्‍ट्राचा टक्का वाढवण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे या वर्षी राज्यातून तब्बल 500 विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

एका छोटेखानी कार्यक्रमात गुरुवारी पेस अकॅडमीने यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांना कौतुक सोहळा आयोजित केला होता. अकोल्यासारख्या छोट्याशा शहरात आयआयटीसारखा अत्यंत कठीण समजल्या जाणा-या परीक्षेसाठी मार्गदर्शनाची संधी उपलब्ध नसताना पेसच्या व्हिडिओ कॉन्फरन्स अभ्यास वर्गामुळे कपिलला हे यश मिळवता आले. आयआयटी जेईई मेन परीक्षेत 360 पैकी 335 गुण मिळवणा-या कपिलने अ‍ॅडव्हान्स परीक्षेत 307 गुण मिळवत 13 वा क्रमांक पटकावला.

ठाण्याच्या शलाका कुलकर्णी शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबर विविध स्पर्धांमध्येही मोठे यश मिळवले आहे. वादविवाद स्पर्धेत नेहमी प्रथम क्रमांक मिळवणारी या विद्यार्थिनीला तिची आई डॉ.अपर्णा कुलकर्णीचा आदर्श आहे. बहीण अहमदाबादच्या आयआयएममध्ये प्रवेश मिळवत असताना आपणही काही तरी करून दाखवले पाहिजे, ही तिची इच्छा होती. ‘पेस’ने तिच्या जिद्दीला आकार दिला. आयआयटीसारख्या कठीण परीक्षांना न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे. या जगात काहीच कठीण नसते, फक्त ते पार करण्याची ताकद तुम्ही दाखवायला हवी, असे शलाका सांगते.

शो मस्ट गो ऑन : अपंग मुलांमधून देशात चौथा आलेला अमन विराणी, नाशिकमध्ये फारशा सुविधा नसतानाही मोठे यश मिळवणारी राही बजाज, आयआयटी अ‍ॅडव्हान्स परीक्षेपूर्वी दोन दिवस अगोदर वडिलांचे निधन होऊनही न डगमगणारा के. मित यांनी कठीण परिस्थितीमधून कसे यश मिळवायचे याचा धडाच नवोदितांसमोर ठेवला.

कॉम्प्युटर सायन्स करायचंय : कपिल वैद्यला मुंबई आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्स करायचे आहे. ‘विद्यार्थ्यांनी पाठांतराऐवजी अभ्यास समजावून करायला हवा. दररोज अभ्यास करण्याची शिस्तही बाळगायला हवी. माझ्याकडे मोबाइल फोन नाही, फेसबुकपासूनही मी दूर राहिलो आहे. मुख्य म्हणजे जंकफूडऐवजी आईने दिलेला डबा मनापासून खाल्ला,’ असे त्याने सांगितले.