आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटीयन्सचे पायही मातीचे! 50 टक्के विद्यार्थी करतात कॉपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील क्रिम टॅलेन्ट आयआयटी मध्ये असते असा सर्वसाधारण समज आहे, याला आयआयटीयन्सनीच छेद देणारा खुलासा केला आहे. मुंबईतील आयआयटीच्या 50 ट्क्के विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. तर, कॉलेजचे डीन यू. ए. याज्ञिक यांनी गेल्या तीन-चार वर्षांमध्येच असाइनमेंट व प्रोजेक्टमध्ये असे प्रकार घडत असल्याचे लक्षात आले असल्याचे सांगितले आहे.
'आयआयटी-बी' चे विद्यार्थी 'इनसाइट' हे मासिक चालवतात. या मासिकाने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणातून आयआयटीयन्सचे कॉपीचे 'टॅलेन्ट' उघड झाले आहे. 'आयआयटी-बी'च्या 'इनसाइट' मासिकाने शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना इ-मेलद्वारे एक सर्वेक्षण फॉर्म पाठवला त्याला जवळपास 300 विद्यार्थांनी प्रतिसाद दिला.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार 50 टक्के विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे मान्य केले आहे. तर, काही विद्यार्थ्यांनी छोट्या-मोठ्या प्रोजेक्ट्स, असाइनमेंटसाठी असे प्रकार केल्याचे म्हटले आहे. कॉपीची कबुली देणार्‍या विद्यार्थ्यांनी आयआयटी संस्थेला फसवले असल्याचेही मान्य केले आहे. कॉपीची संधी असेल तरच तसे केले जाते असेही त्यांनी सर्वेक्षणात सांगितले आहे. 20 टक्के विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यापूर्वी दोन वेळा विचार करत असल्याचे म्हटले आहे. या कॉपी बहाद्दरांनी यापुढे असे करणार नसल्याचेही आश्वासन दिले आहे.
आयआयटीचे डीन याज्ञिक यांनी अशा विद्यार्थ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना स्वतःहून ड्रॉप घेण्याची शिक्षा दिली जात असल्याचेही ते म्हणाले.