आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Iit Pawai Student Fall Down From 6th Floor Of Hostel, Found Dead

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांचा होस्टेलच्या 6 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मृत अनिकेत आंभोरे)
मुंबई- आयआयटी पवई येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या अनिकेत आंभोरे (वय 22) या विद्यार्थ्याचा काल रात्री उशिरा हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या अथवा घातपात याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू आहे.
आयआयटी पवई प्रशासनाने मात्र त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. हॉस्टेलमधील मुलांनी सांगितले की, तो फोनवरून बोलत असताना त्याचा तोल गेला असण्याची शक्यता आहे. कारण हॉस्टेलमधील रूममध्ये मोबाईलची रेंज येत नसल्यामुळे बहुतेक मुले गॅलरी किंवा बाल्कनीमध्ये जाऊन बोलतात. अनिकेतही फोनवरून बोलत होता. त्याचवेळी ही घटना घडल्याचे मुलांनी सांगितले. पोलिसांनी अनिकेतचा मोबाईल ताब्यात घेतला असून, घटना घडली त्यावेळी तो कोणाशी बोलत होता याची माहिती घेतली जात आहे. अनिकेतच्या कुटुंबियांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
पोलिस मात्र सर्व शक्यता गृहित धरून तपास करीत आहेत. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा करीत आहेत. अनिकेतच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. रूग्णालयात नेल्याक्षणी डॉक्टरांनी त्याला जागेवरच मृत घोषित केले होते.