आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी समितीची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरिता धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.
या समितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, पुणे, उल्हासनगर, औरंगाबाद, महानगरपालिकांचे आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यास सभापती, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर पालिका प्रशासन मुंबईचे संचालक, सहसचिव तथा संचालक (नगर रचना) नगर विकास विभाग, इचलकरंजी आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तर नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणेचे संचालक समितीचे सदस्य सचिव असतील.
ही समिती अनधिकृत बांधकामासंदर्भात परिणामकारक कार्यवाही करणे, अशा बांधकामांना प्रतिबंध घालणे, बांधकामास परवानगी देण्याची प्रक्रिया सुकर आणि गतिमान करण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करणे आदी बाबींविषयी आवश्यक उपाययोजना व ठरवावयाचे धोरण सुचविणार आहे. नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करण्याच्यादिशेने हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.