आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Loudspeakers At Mosques Must Go Bombay High Court

मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर हटवा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रशासनाची परवानगी न घेता मशिदींवर लावण्यात आलेले लाऊड स्पीकर त्वरीत हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. मशिदींसह गणेशोत्सव आणि नवरात्रातही विनापरवाना लाऊड स्पीकर लावता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जिथे कुठे अनधिकृत लाऊड स्पीकर दिसतील तर ते जप्त करा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती पी. डी. कोडे यांनी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी हा निकाल दिला. नवी मुंबईचे संतोष पचालाग यांनी माहिती अधिकाराचा हवाला देताना जवळपास 92 मशिदींवर परवानगी नसताही लाऊड स्पीकर बसवण्यात आल्याचे अर्जात नमूद केले होते. या मशिदी सायलेन्स झोनमध्ये असतानाही हे स्पीकर सुरू होते् उच्च न्यायालयाने सरकारला आदेश देताना म्हटले की, जर हे स्पीकर विनापरवाना सुरू असतील तर ते चालवता येणार नाहीत. त्यांना तशी परवानगी दिली जाऊ शकत नाही.