आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशीदींवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवा, मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
मुंबई - मशीदींवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नसल्यास असे लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील मशीदींवरील अशा बेकायदेशीर लाऊडस्परीकर कारवाई करण्याचे हे निर्देश आहेत.

बेकायदेशीर लाऊडस्पीकर मग ते गणेशोत्सवातील असो, नवरात्रीतील असो किंवा मशीदींवर लावण्यात आलेले, अशा लाऊडस्पीकरवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीप्रसंगी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. याबाबतीत कोणताही धर्म किंवा जातीपातीला लक्ष्य करण्याचा उद्देश नसून नागरिकांनीच ध्वनी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचेही न्यायायाने म्हटले आहे.

परिसरातील 49 पैकी 45 मशीदींवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकर्ससाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, असे माहिती अधिकारांतर्गत समोर आले. त्यानंतर नवी मुंबई येथील रहिवासी संतोष पाचलग यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. या मशीदी सायलेंस झोन मध्ये असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले होते. ध्वनी प्रदूषणाच्या नियमानुसार ध्वनी पातळी (डेसीबलमध्ये क्षमता) पाळली जात नसल्याचा दावाही करण्यात आला होता.

अशा प्रकारची परवानगी न घेता लाऊडस्पीकर लावणा-या मशीदींचा शोध घेऊन त्यावर काय कारवाई केली जाणार? अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली आहे. तसेच यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पाचलग यांच्या वकिलांनी हे लाऊडस्पीकर जप्त केले जाऊ शकतात असे सुचवले. गणपणी आणि नवरात्रोत्सवात मंडळे यासाठी परवानगी घेत असल्याची माहितीही त्यांनी न्यायालयात सादर केली. त्यावर कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर लाऊडस्पीकर जप्त केले जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्स काळातील ध्वनीप्रदूषणावरही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तसेच त्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.