आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बेकायदा टेलिफाेन एक्स्चेंज उद‌्ध्वस्त; 5 जण अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील गाेवंडी भागात बेकायदा चालविण्यात येणारे टेलिफाेन एक्स्चेंजचा भंडाफाेड करण्यात गुन्हे शाखा व एटीएसच्या पथकाला यश अाले अाहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात अाली. माेबाइल,  लॅंडलाइन व इंटरनेटसाठी टेलिफाेन खात्याच्या नेटवर्कला बायपास करून गेल्या चार महिन्यांपासून हा गाेरखधंदा सुरू हाेता. या माध्यमातून अाराेपींनी टेलिफाेन खात्याला तब्बल ४९ काेटी १४ लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस अाले अाहे. 

या प्रकरणी शिवाजीनगर, मानखुर्द, गाेवंडी व ट्राॅम्बे परिसरात छापे टाकण्यात अाले अाहेत. साैदी अरेबियात राहणारे भारतीय लाेक या बेकायदा टेलिफाेन एक्स्चेंजचा वापर करत असल्याचेही तपासात उघडकीस अाले अाहे. या बेकायदा एक्स्चेंजचे सर्व्हर युराेपमध्ये असल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

चायनीज यंत्रांचा वापर
पाेलिस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या माहितीनुसार, या गाेरखधंद्यामुळे टेलिफाेन खात्याला गेल्या चार महिन्यांत परदेशातून हाेणाऱ्या फाेन काॅल्सच्या माध्यमातून मिळणारा ४९ काेटी रुपयांचा ताेटा सहन करावा लागला. ४४ सिम बाॅक्सच्या माध्यमातून हे काॅल्स केले जात हाेते. या यंत्रणेसाठी अाराेपींकडून चायनीज यंत्रांचा वापर करण्यात अाला हाेता. तसेच या टाेळीच्या  मास्टरमाइंडने चीनमध्ये जाऊन त्याचे प्रशिक्षण घेतले हाेते, अशीही माहिती समाेर अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...