आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Images Surface Online Of Mumbai\'s Youth Jihadist Before Suicide Bombing

हा आहे ISISमध्ये सामील झालेला कल्याणचा शाहीन, लढतानाची छायाचित्रे आली समोर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इस्लामिक दहशतवादी संघटना ISIS कडून मुंबईतील कल्याण परिसरातील लढणारा युवक शाहीन टंकी याचा आत्मघातकी हल्लात मृत्यू झाल्याची माहिती मागील आठवड्यात पुढे आली होती. दरम्यान, शाहीन टंकीची इराक-सिरियातील ताजी छायाचित्रे ISIS शी संबंधित वेबसाईटने आपल्या साईटवर टाकली आहेत. त्यामुळे शाहीन टंकीचे इराक-सिरियामध्ये लढतानाची छायाचित्रे प्रथमच सार्वजनिकरित्या उपलब्ध झाली आहेत.
माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, वरील छायाचित्र हे आत्मघाती हल्ल्यात सामील होण्याअगोदरचे आहे. याबाबत सांगितले जात आहे की, या महिन्याच्या सुरुवातीला शाहीनने सीरियातील अल हसाका शहरात आत्मघाती हल्ला केला होता. यात शाहीनचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. मात्र, याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगता येत नाही. तसेच हा फोटो ताजा आहे की मागील काही दिवसातील याबाबतही पुष्टी मिळाली नाही. या फोटोत शाहीन टंकी एका कारमध्ये बसलेला दिसून येत आहे. तर, त्याच्या बाजूला ISISचा ड्रेसकोड असलेल्या व्यक्तीचा हात दिसत आहे.

कुटुंबियांना मिळाली मृत्यूची माहिती- जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाहीन टंकीच्या कुटुंबियांनी एनआयए या भारतीय सुरक्षा यंत्रणांना संपर्क साधला होता. शाहीनच्या कुटुंबियांनी सांगितले होते की, त्यांच्या फोनवर इराकमधून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फोन करून शाहीनचा जिहादच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान, एनआयएने शाहीनच्या मृत्यूबाबत किंवा तो जिंवत आहे का याबाबत माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एनआयएने लागलीच कोणताही निष्कर्ष काढण्यास नकार दिला आहे.
पुढे वाचा. शाहीनची अंतिम काय होती व त्याने आईला काय दिला संदेश...